केप टाउन : दक्षिण आफ्रिकेतील साखर निर्यात मे २०२२ ते एप्रिल २०२३ या व्यावसायिक वर्षात आधीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढेल असे अनुमान अमेरिकेच्या कृषी विभागाने वर्तवले आहे. ‘यूएसडीए’ने आपल्या दक्षिण आफ्रिकेबाबतच्या वार्षिक साखर अहवालात म्हटले आहे की, चालू वर्षी निर्यात ५,९५,००० टनावरुन वाढून ७,००,००० मेट्रिक टन होण्याची अपेक्षा आहे. ही निर्यात उत्पादनात वृद्धी आणि साखरेच्या जागतिक किमतीत झालेल्या किरकोळ दरवाढीमुळे होण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोरिया २०२०-२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी कच्च्या निर्यातीसाठी अग्रेसर बाजारपेठ होती. एकूण परकीय विक्रीच्या त्याचे प्रमाण २८ टक्के इतके होते. त्यापाठोपाठ मलेशिया आणि इंडोनेशिया यांचे प्रमाण अनुक्रमे १५ टक्के आणि ९ टक्के होते.
युएसडीएने सांगितले की, इतर निर्यातीच्या देशांमध्ये चीन, अमेरिका, तैवान, जपान यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका २४,२२० टन वार्षिक कच्च्या साखरेच्या वितरणासह अमेरिकन टेरिफ कोट्याचा लाभार्थी आहे. त्याचा वापर दरवर्षी केला जातो. युएसडीएने सांगितले की, २०२२-२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत कच्च्या साखरेचे उत्पादन १३ टक्क्यांनी वाढून २.२२ मिलियन टन झाले आहे. आधीच्या वर्षातील १.९७ मिलियनपेक्षा ते अधिक आहे.