प्रिटोरिया : गेल्या महिन्यात क्वाजुलू – नटाल येथील दंगलीत सुमारे ५,००,००० टन उसाची हानी झाली आहे अशी माहिती दक्षिण अफ्रीकेतील ऊस उत्पादक संघटनेने दिली. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील साखर उद्योगाचे R84 मिलियनहून अधिक नुकसान झाले आहे. दंगलीमध्ये ५ लाख टनाहून अधिक ऊस पेटवून देण्यात आला होता. क्वाजुलू – नटालमध्ये कारखान्यांनी असा जळालेला ऊस स्वीकारलेला नाही. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, जर कारखान्यांनी अशा हानी झालेल्या ५ लाख टन उसाचे गाळप केले नाही तर ऊस उत्पादकांचे R300 मिलियन नुकसान होऊ शकतो.
साउथ अफ्रीकन केन ग्रोवर्स असोसिएशनचे अध्यक्ष अँड्र्यू रसेल यांनी सांगितले की,दक्षिण आफ्रिकेतील मुख्य साखर उत्पादक असलेल्या क्वाजुलू नताल आणि गौतेंग मधील काही भागातील दंगलीत लुटमार झाली. यामध्ये व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि संपत्तीचे नुकसान झाले. अनेक लोकांना ग्रोकेन, दक्षिण आफ्रिका विशेष जोखीम विमा संघाकडील (एसएआसआरआयए) नुकसानभरपाई, मदतीची प्रतीक्षा आहे. दंगलीत गंभीर स्वरूपात नुकसान झालेल्या ऊस उत्पादकांसाठी सरकारी संस्थांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. यामध्ये व्यापार, उद्योग, प्रतीस्पर्धा विभाग, राष्ट्रीय कृषी विपणन परिषद, औद्योगिक विकास विभागाचे कृषी अनुदान युनिट, शेती आणि भूमी सुधार तसेच ग्रामिण विकासाबाबत संसदीय पोर्टफोलिओ समितीशी संपर्क साधण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link