साऊथ इस्टर्न कोलफिल्ड्स कंपनीची 600 मेगावॉट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प विकसित करण्याची योजना

कोल इंडिया या कंपनीच्या सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक उप-कंपन्यांपैकी एक असलेली साऊथ इस्टर्न कोलफिल्ड्स (एसईसीएल) ही कंपनी येत्या काही वर्षांत छतावर तसेच जमिनीवर 600 मेगावॉट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प उभारणार आहे.उर्जा निर्मिती व्यवसायाचा विस्तार तसेच व्यवसायात वैविध्य आणणे तसेच “संपूर्णतः शून्य उत्सर्जना”चे लक्ष्य साध्य करणे” या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून कंपनी हा उपक्रम हाती घेत आहे. वर्ष 2070 पर्यंत “संपूर्णतः शून्य उत्सर्जना”चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप-26 च्या मंचावर घोषित केलेल्या अधिक विस्तृत “पंचामृत”धोरणाला अनुसरून कंपनीने हे ध्येय निश्चित केले आहे. मिनिरत्न दर्जाची एसईसीएल ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली कंपनी एक हजार कोटी रुपयांहून अधिक निधीसह उपरोल्लेखित प्रकल्प विकसित करण्याचे नियोजन करत आहे.

छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये एसईसीएलच्या कार्यान्वित क्षेत्रांमध्ये 180 मेगावॉट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांचे काम यापूर्वीच सुरु झाले असून ते काम विकासाच्या विविध टप्प्यांवर आहे.

कोल इंडिया कंपनीतर्फे निर्माण होणाऱ्या कार्बन फूटप्रिंट्सचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच उर्जेच्या बाबतीत अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठीच्या विस्तृत योजनेचा भाग म्हणून वर्ष 2026 पर्यंत 3000 मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय उर्जा प्रकल्प उभारून संपूर्णतः शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे. कोल इंडिया कंपनीच्या कोळसा निर्मिती क्षमता संपलेल्या खाणींमध्ये पंप स्टोरेज पॉवर (पीएसपी) प्रकल्पांसाठी संभाव्य स्थाने शोधण्यासाठी कंपनीने नुकतेच सतलज जल विद्युत निगम (एसजेव्हीएनएल) या कंपनीशी सहकार्यात्मक संबंध स्थापित केले आहेत.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here