संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण 96% राहण्याची शक्यता

संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण 96% राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी कमी पर्जन्यमानाबाबत चिंता करू नये असे भू -विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

2023 मधील नैऋत्य मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते म्हणाले की यंदा मोसमी पावसाचे प्रमाण ± 5% (सर्वसाधारण ) फरकासह दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 96% असेल.

डॉ.रविचंद्रन म्हणाले, हा अंदाज कालनिरपेक्ष आणि सांख्यिकीय मॉडेल्सवर आधारित आहे आणि तो सूचित करतो की परिमाणात्मकदृष्ट्या,यंदा मोसमी पावसाचे प्रमाण ± 5% (सर्वसाधारण ) फरकासह दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 96% असेल. 1971-2020 च्या आकडेवारीवर आधारित संपूर्ण देशभरातील हंगामी पावसाची दीर्घ कालावधीची सरासरी 87 सेमी आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी विस्तृत सादरीकरण देताना सांगितले की, सध्या, विषुववृत्तीय प्रशांत महासागर क्षेत्रात ला निनोची स्थिती तटस्थ स्थितीत बदलली आहे. एमएमसीएफएस तसेच इतर हवामान मॉडेल अंदाज सूचित करतात की पावसाळ्यात अल निनोचा प्रभाव विकसित होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये उत्तर गोलार्धातील बर्फाच्छादित क्षेत्राचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी असल्याचे आढळून आले.उत्तर गोलार्धात तसेच युरेशियावर हिवाळा आणि वसंत ऋतुतील बर्फाचे आच्छादन असून त्याची उन्हाळी मान्सूनच्या पावसाशी सामान्यपणे व्यस्त संबंध राहण्याची प्रवृत्ती आहे.

डॉ.मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, भारतीय हवामानशास्त्र विभाग मे 2023 च्या शेवटच्या आठवड्यात हंगामी मोसमी पावसाचे नवे अंदाज जारी करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here