पुणे: पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यात गेल्या २४ तासात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडला. नैऋत्य मॉन्सून राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार आहे आणि पंजाब, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, विदर्भ आणि तेलंगणामध्ये सक्रिय आहे.
बिहार आणि झारखंडमध्ये वादळ आणि वीजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. 40-50 किमी प्रतितास वेगाने येणारे वारे पश्चिमेकडील, नैऋत्य आणि उत्तर अरबी समुद्री आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये जाण्याची शक्यता आहे. ओडिशा-पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्ट्यांवरही पावसाची शक्यता आहे. मच्छीमारांना पुढील 24 तासांमध्ये या भागात जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.