देशात २८ जुलै २०२३ अखेर मक्का, ऊस, भात पिक पेरणीची आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली : कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाने २८ जुलै २०२३ अखेर खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रातील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, भारतातील शेतकऱ्यांनी यावर्षी आतापर्यंत ८३०.३१ लाख हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी केली आहे. तर गेल्या वर्षी समान कालावधीत ८३१.६५ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा थोडी कमी पेरणी झाली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५६ लाख हेक्टरमध्ये लागण केली आहे. गेल्यावर्षी ५३.३४ लाख हेक्टरमध्ये ऊस लागण करण्यात आली होती.

कमोडीटीनुसार भाताची पेरणी २३७.५८ लाख हेक्टरमध्ये झाली आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत २३३.२५ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती.

मक्क्याची आतापर्यंत ६९.३६ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी ६८.९४ लाख हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here