देशात खरीफ पिकांची १०६५ लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्रात पेरणी

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाने २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत खरीफ पिकांतर्गत पेरणीच्या सद्यस्थितीची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार देशात खरीफ पिकांची १०६५ लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये उसाचे क्षेत्र मागील वर्षाच्या ५७.११ लाख हेक्टरच्या तुलनेत थोडे वाढून ५७.६८ लाख हेक्टर इतके झाले आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर मध्ये

अनु क्रम पिकाचे नाव पेरणी  क्षेत्र
2024 2023
1 भात 394.28 378.04
2 डाळी 122.16 115.55
a तूरडाळ 45.78 40.74
b उडीद 29.04 30.81
c मूग 34.07 30.57
d कुळीथ 0.24 0.26
e मटकी 9.12 9.37
f इतर डाळी 3.91 3.80
3 श्रीअन्न आणि भरड धान्ये 185.51 177.50
a ज्वारी 14.93 13.84
b बाजरी 68.85 70.00
c नाचणी 9.17 7.63
d लहान/बारिक तृणधान्य 5.34 4.78
e मका 87.23 81.25
4 तेलबिया 188.37 187.36
a भुईमूग 46.82 43.14
b सोयाबीन 125.11 123.85
c सूर्यफूल 0.71 0.68
d तिळ 10.67 11.58
e कारळे 0.31 0.36
f एरंडेल 4.70 7.71
g इतर तेलबिया 0.04 0.05
5 ऊस 57.68 57.11
6 ताग आणि मेस्टा 5.70 6.56
7 कापूस 111.39 122.74
एकूण 1065.08 1044.85

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here