देशभरात आतापर्यंत ५४,००० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी

नवी दिल्ली : चालू रब्बी हंगाम, वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत ५४,००० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी, समान कालावधीतील ३४,००० हेक्टरच्या तुलनेत ही पेरणी ५९ टक्के अधिक आहे. रब्बी हंगामातील मुख्य पिक असलेल्या गव्हाची पेरणी ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. मार्च-एप्रिल या कालावधीत याची गव्हाची कापणी केली जाते. याशिवाय, हरभर व इतर पिकेही या रब्बी हंगामाच्या कालावधीत घेतली जातात.

द प्रिंटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या गव्हाच्या लागवडीचे काम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये गतीने सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे ३९,००० हेक्टर, उत्तराखंडमध्ये ९,००० हेक्टर, राजस्थानमध्ये २,००० हेक्टर आणि जम्मू-काश्मीरमध्ये १,००० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी पू्र्ण झाली आहे. गेल्यावेळच्या २.३१ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात ४.६८ लाख हेक्टरमध्ये इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. या रब्बी हंगामात २८ ऑक्टोबरपर्यंत सर्व पिकांचे एकूण क्षेत्र ३७.७५ लाख हेक्टर आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र २७.२४ लाख हेक्टरपर्यंत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here