कुशीनगर : शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यापूर्वीच कप्तानगंज साखर कारखाना बंद करण्यात आला. शेतकऱ्यांना गाळप झालेल्या उसाचे पैसेही मिळालेले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी दोन तास तहसीलदारांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले.
आंदोलनावेळी बोलताना माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह म्हणाले, कप्तानगंज साखर कारखान्याने आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यापूर्वीच काम बंद केले. कारखाना तत्काळ सुरू करायला हवा. कप्तानगंज विभागासह जनपद मधील सर्व विभागांनाकडून जी कामे करून घेतली, त्याचे पैसे त्वरीत द्यायला हवेत. कप्तानगंज साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपये थकीत आहेत. ते त्वरीत मिळावेत.
माजी आमदार पूर्णमासी देहाती, सपाचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र प्रताप सिंह, परवेज आलम यांची भाषणे झाली. तहसीलदार अहमद फरीद खान, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आर. के. सक्सेना, डीजीएम विनोद श्रीवास्तव आदींनी निवेदन स्वीकारून आश्वासन दिले. दीपक सिंह, सतीश यादव, रवींद्र सिंह, सुभाष गुप्ता, के. के. यादव, खलील अन्सारी, अलाद्दीन अन्सारी, विजय यादव उपस्थित होते.
ऊस दरप्रश्नी कॉंग्रेसचे निवेदन कप्तानगंज साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे पैसे न मिळाल्याबद्दल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काॅंग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे महाराजगंज प्रभारी रणजित जयस्वाल ऊर्फ रिंकू यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राधेश्याम उपाध्याय यांना १६ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुरेंद्र गुप्ता, धीरज, मनोज, राजेश, मनीष आदी उपस्थित होते.