नवी दिल्ली : लोकसभा सभागृहात बोलताना खा. बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी आहे. ऊसतोड कामगारांसाठी कुठल्याही सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. त्यांच्या नावावर केवळ राजकारण केले गेले. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि ऊसतोड़ कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सरकार ने विशेष तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार सोनवणे म्हणाले कि, माझी शेतकरी पुत्र अशी ओळख आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची मला जान आहे. जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांबरोबरच शेतकरी, महिला आणि युवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.