धाराशिव : नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडने एक फेब्रुवारीपासून कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीच्या अंतिम ऊस दरापेक्षा शंभर रुपये प्रतिटन विशेष अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. कारखान्याने आजअखेर ३.२६ लाख टन गाळप केले आहे. चालू गळीत हंगामामध्ये हंगाम सुरुवातीस ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन ठोंबरे यांनी केली.
याबाबत माहिती देताना अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, नॅचरल शुगरने उत्पादित केलेल्या ‘नॅचलर ऑरगॅनिक फर्टिलायझर’ या ऊस पिकासाठी परिपूर्ण असलेल्या सेंद्रिय खताचा, खास सवलतीचा दर ३०० रुपये प्रति पोतेच्या दरामध्ये ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांना कारखाना यावर्षी पुरवठा करत आहे. आपला ऊस उत्कृष्ट दर्जाचा आणि टनेज वाढवून उसाचे विक्रमी उत्पादन शेतामध्ये घ्यावयाचे असेल तर वरील सेंद्रिय खत नॅचरल शुगरचे ऊस विकास विभागाच्या सल्ल्यानुसार ऊस पिकास देऊन उत्पादन वाढवावे. गाळपाची उद्दिष्टपूर्ती होईल या दृष्टीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नॅचरल शुगरलाच देऊन सहकार्य करावे.