ऊस बिले देण्यास गती द्या : जिल्हाधिकाऱ्यांचे कारखान्यांना आदेश

मुजफ्फरनगर : ऊस खरेदी, गाळपासह ऊस बिले देण्याच्या विषयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांचे अधिकारी आणि आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांना ऊस बिल देण्याच्या कामास गती द्यावे असे निर्देश देण्यात आले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानानिहाय ऊस खरेदी, गाळप आणि ऊस बिले देण्याची स्थिती यांचा आढावा घेतला. भैसाना साकर कारखान्याकडे गेल्या हंगामातील १०५ कोटी रुपये थकीत असल्याबाबत त्यांनी कारखान्याचे प्रतिनिधी देवेंद्र सिंह यांना फटकारले. कारखान्याने दररोज किमान तीन कोटी रुपयांच्या साखरेची विक्री करून त्यातून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी १४ दिवसांत नियमानुसार बिले द्यावीत असे निर्देश त्यांनी दिले. कारखाना गेट तसेच ऊस खरेदी केंद्रांवरील वे-ब्रिज तपासणीच्या सूचना देण्यात आल्या. वाढती थंडी पाहता कारखान्याच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी पुरेशा सुविधा द्याव्यात अशी सूचना करण्यात आली. जिल्ह्यात खरेदी केलेल्या उसापैकी आतापर्यंत ७२४ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here