नवी दिल्ली : देशातील बहुतांश ठिकाणी उसाच्या गळीत हंगामाने गती घेतली आहे. या हंगामात आतापर्यंत तब्बल १६ हजार कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहेत. देशातील साडेपाच कोटी कुटुंबांना याचा फायदा झाला आहे, अशी माहिती ‘इस्मा’च्यावतीने देण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वाधिक रक्कम आली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६५०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ५००० कोटी रुपये मिळाले आहेत.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याचा घेतलेला निर्णय आणि इथेनॉलच्या किमतीत केलेली वाढ फायदेशीर ठरली आहे. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. साखर उद्योगातील आघाडीची संघटना इस्माच्या मते साखर कारखान्यांकडे तरलता वाढल्याने ऊस बिले देण्यास गती आली आहे. इस्माने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या चालू हंगम २०२४-२५ मध्ये १० लाख टन साखर निर्यातीस २० जानेवारी रोजी मान्यता दिली. तर २९ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने उसाचे उप उत्पादन असलेल्या सी-जड गुळापासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत १.६९ रुपये प्रति लिटरने वाढवून ५७.९७ रुपये प्रति लिटर केली.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.