अफजलगढ : बहादरपूर, द्वारिकेशपूरममधील द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने मिरपूर घासीमधील शेतकरी प्रदीप कुमार शर्मा यांच्या ऊस पिकावर ड्रोनद्वारे किटकनाशक तथा नॅनो युरियाची फवारणी करण्यात आली. यावेळी परिसरातील इतर गावांतील अनेक ऊस उत्पादक शेतकरी या ड्रोनद्वारे औषध फवारणीवेळी उपस्थित होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डीसीओ पी. एन. सिंह यांनी सांगितले की, ड्रोनद्वारे अधिक क्षेत्रावर औषध फवारणी केली जाते. ऊस विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार ढाका यांनी सांगितले की, सध्याच्या काळात शेतीमध्ये मजुरांच्या टंचाईची समस्या अधिक भेडसावत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पिकावर कीटकनाशक, खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतात. यावेळी, प्रदीप कुमार शर्मा, अमरिक सिंह, बलविंदर सिंह, हरविंदर, अनिल राठी, बलवंत सिंह, सुखवीर सिंह, अमरजीत सिंह, ऊस समितीचे सचिव साहब सिंह सत्यार्थी, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक विश्वामित्र पाठक यांसह कारखान्याचे इतर अधिकारी उपस्थित होते.