बिजनौर, उत्तर प्रदेश: जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव दिसू लागला आहे. ऊसाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या टीम्सना या रोगाचा आढळ अनेक ठिकाणी झाला. जर शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर उत्पादनावर परिणाम होण्याचा धोका आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस सर्व्हेवेळी पोक्का बोईंग रोगाचा आढळ झाला आहे. जिल्ह्यातील ५ टक्के ऊस पिकावर या रोगाचा फैलाव दिसून येत आहे. या रोगामुळे ऊसाची वाढ खुंटते. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. शेतकऱ्यांना या रोगावरील उपाययोनेची माहिती दिली जात आहे. त्यातून वेळीच उपाय करणे शक्य होणार आहे.
ऊस विभागाचे अप्पर सांख्यिकी अधिकारी विकल भारती यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यावर या रोगाचा फैलाव होतो. हवेतील आद्रतेमुळे रोग अधिक फैलावतो आणि पिकाचे नुकसान होते. या रोगामुळे ऊसाची पाने वाळू लागतात. शेतकऱ्यांना सध्या यावरील उपाययोजनेची माहिती दिली जात आहे असे अप्पर सांख्यिकी अधिकारी विकल भारती यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link