उत्तर प्रदेशात उसावर पोक्का बोईंगचा फैलाव, पिकाची हानी

मेरठ : देशात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला आघाडीवर आणण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या पश्चिम विभागात उसावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. या महामारीमुळे ऊस विभागातील अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेतकरी हा रोग टॉप बोरर असल्याचे मानून किटकनाशके वापरून उपचार करीत आहेत. मात्र, याला आळा घालण्यासाठी बुरशीनाशकांची गरज भासते.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मेरठमध्ये उसाचे उत्पादन राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये विभागात जवळपास ४० लाख क्विंटलहून अधिक उसाचे गाळप झाले आहे. मात्र, विभागात हजारो हेक्टरवर पोक्का बोईंगचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. आरबीएनएस लक्सर साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. बी. एस. तोमर यांनी सांगितले की, पोक्का बोईंग आणि टॉप बोरर या दोन्ही रोगाची लक्षणे समान आहेत. त्यामुळे शेतकरी किटकनाशके वापरत आहेत. खरेतर यावर बुरशी नाशकाची फवारणी गरजेची आहे.

मेरठ विभागाचे ऊस उपायुक्त राजेश मिश्र म्हणाले की, शेतकऱ्यांना पोक्का बोईंग रोगाची माहिती दिली जात आहे. विभागीय अधिकारी शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करीत आहेत. यासोबतच रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांची मदतही केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here