संपूर्णानगर, उत्तर प्रदेश: ऊस थकबाकीच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या नेत्या अनिता यादव यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आणि शेतकऱ्यांनी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना पैसे मिळावीत अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळाले नाहीत तर पक्षाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा यावेळी नेत्या यादव यांनी दिली.
ऊसाचे पैसे मिळावेत यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनिता यादव आणि धिरेंद्र त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली संजय मौर्य, रामेश्वर आदींनी संपुर्णानगरातील किसान सहकारी साखर कारखान्यात जाऊन निवेदन दिले. कारखान्याचे व्यवस्थापक आझाद भगत सिंह यांच्या अनुपस्थितीत मुख्य ऊस अधिकारी दमिनेश कुमार यांना शेतकरी आणि सपा कार्यकर्त्यांच्यावतीने निवेदन दिले.
समाजवादी पक्षाचे माजी उमेदवार अनीता यादव, नरेश यादव, तरसेम सिंह, इस्तियाक खान यांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शेतकरी अतिशय कमी पैशात आपले खर्च भागवत आहेत. जर लवकर पैसे मिळाले नाही तर २० ऑगस्टपासून धरणे आंदोलन केले जाईल. त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला. यावेळी चरणजीत सिंह, हरविंदर सिंह, हजूरा सिंह, कुलविंदर आदींसह शेतकरी, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link