बांगलादेश, श्रीलंकेला भारताकडून इथेनॉल आयात करण्यात रस

नवी दिल्ली : बांगलादेश आणि श्रीलंकेने पेट्रोल आणि डिझेलसोबत मिश्रण करण्यासाठी भारताकडून उत्पादित इथेनॉल आयात करण्यात रस दाखवला आहे. जर हे शक्य झाले तर भारतीय शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मदत मिळेल. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या जगातील पहिल्या बीएस-VI (स्टेज II) इलेक्ट्रिक फ्लेक्स इंधन वाहन प्रोटोटाइपच्या लॉन्चवेळी बोलताना रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल अर्थव्यवस्थेत भारताच्या ग्रामीण क्षेत्रातील अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद आहे.

मंत्री गडकरी म्हणाले की, मला बांगलादेशच्या पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली. आम्ही नुमालीगढहून पाइपलाइनद्वारे बांगलादेशला पेट्रोल आणि डिझेलची विक्री करतो. आम्ही इथेनॉलबाबतही चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान, श्रीलंकेच्या मंत्री आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मला विचारले की, तुम्ही या देशांना इथेनॉलची निर्यात करू शकतो का ?

जैव इंधन क्षेत्रात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आईओसी) ने केलेल्या कामाचे कौतुक करताना मंत्री गडकरी म्हणाले की, अशा उदाहरणांमुळे देशातील इथेनॉल अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्यास मदत होईल. इथेनॉलमध्ये देशाच्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. आसाममधील नुमालीगढ़ रिफायनरी येथे IOC बांबूपासून इथेनॉल बनवत आहे.

लाँचिंग इव्हेंटवेळी उपस्थित असलेले तेल मंत्री एच. एस. पुरी आणि आयओसीचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांना गडकरींनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळून नुमालीगडमधून पाइपलाइनद्वारे बांगलादेशला विक्री करण्याची सूचना केली. यामुळे वस्तूंना चांगला भाव मिळेल, बांगलादेशातील प्रदूषण कमी होईल आणि भारतीय कंपन्यांसाठी इथेनॉलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण होईल, असे ते म्हणाले.

गडकरी म्हणाले की, ते फ्लेक्स – फ्युएल वाहनांसाठी २००४ पासून काम करीत आहेत. आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरद्वारे मंगळवारी लाँच करण्यात आले आहे. जवळपास दोन दशके आधी सुरू केलेल्या प्रयत्नांची ही परिणीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here