कोलंबो : साखरेच्या महागाईपासून श्रीलंकेतील लोकांची सुटका होण्याची शक्यता दिसून येत आहे. राज्यमंत्री जनक वक्कुम बुरा यांनी सांगितले की, लंका शुगर कंपनीच्या माध्यमातून लोकांना साथोसाच्या माध्यमातून साखर किफायतशीर दरात उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.
मंत्री जनक वक्कुम बुरा यांनी सांगितले की, सीडब्ल्यूईच्या माध्यमातून १२५ रुपये (श्रीलंकेचे चलन) प्रती किलो या दराने साखर उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत एक किलो साखर २१० रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे सीडब्ल्यूईच्या माध्यमातून लंका शुगर कंपनीने कमी दरात साखर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री म्हणाले, जेव्हा एप्रिल महिन्यात दरवाढ झाली, तेव्हा सीडब्ल्यूईने लंका शुगरची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध केली. लंका शुगर कंपनीच्या माध्यमातून आम्ही सीडब्ल्यूईकडे देशातील लोकांसाठी आवश्यक साखर लवकरात लवकर उपलब्ध करू. सरकार साथोसाच्या माध्यमातून १२५ रुपये साखर देण्यासाठी हस्तक्षेप करू शकते. बाजारात कितीही दर असेल तरी या दरानेच साखर उपलब्ध करुन दिली जाईल. सीडब्ल्यूईच्या माध्यमातून सलग पाच महिने आम्ही ११५ रुपये दराने साखर उपलब्ध केले होते. आम्ही लोकांना दिलासा देण्याचे प्रयत्न करीत आहोत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link