कृषी क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी श्रीलंकेने मागितला भारताचा पाठिंबा : रिपोर्ट

कोलंबो : श्रीलंकेतील अन्न सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासाठी श्रीलंकेचे कृषी मंत्री महिंदा अमरावीरा यांनी भारताची मदत मागितली आहे, असे श्रीलंकेच्या माध्यमांनी म्हटले आहे.

श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी नुकतीच श्रीलंकेच्या कृषीमंत्र्यांची भेट घेतली. देशातील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी भारताने श्रीलंकेला सतत पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत ही बैठक झाली.

श्रीलंकेत आर्थिक आणि राजकीय गोंधळामुळे, गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. त्यामुळे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची हकालपट्टी झाली आहे.

भारताने गेल्या आठवड्यात, श्रीलंकेला एकूण ३.३ टन अत्यावश्यक वैद्यकीय पुरवठा केला. भारत सरकारच्या आर्थिक सहाय्य, परकीय चलन समर्थन, साहित्य पुरवठा आणि इतर अनेक घटकांनुसार, संकटग्रस्त शेजारील देशाला मानवतावादी भूमिकेतून मदत केली जात आहे.

भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत सरकार आणि भारतातील लोकांनी दान केलेल्या २५ टनांहून अधिक औषधे आणि वैद्यकीय सामग्रीची किंमत SLR 370 दशलक्ष एवढी आहे. हे सुमारे USD 3.5 बिलियन आर्थिक सहाय्य आणि तांदूळ, दूध पावडर, रॉकेल इ. सारख्या वस्तूंच्या पुरवठ्याव्यतिरिक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शेजारधर्म’ धोरणाची साक्ष देत लोकांच्या मदतीला केंद्रस्थानी ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here