शाहजहापूर : कोविड १९च्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढली असून सॅनिटायझरची मागणी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे डालमिया साखर कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. या सॅनिटायझरचा पुरवठा लखनौ, बरेली, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये केला जात आहे.
कोरोना संक्रमणाची वाढती संख्या असल्याने देशातील नागरिक हवालदिल झाले आहेत. महामारीच्या नियंत्रणासाठी ऊसाच्या रसापासून तयार होणारे सॅनिटायझर खूप उपयुक्त ठरत आहे. सद्यस्थितीत सॅनिटायझरची मागणी मार्केटमध्ये खूप वाढली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, बरेली, दिल्ली अशा मोठ्या शहरात सॅनिटायझरची सातत्याने गरज असल्याने डालमिया साखर कारखान्याने त्याचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. येथे नियमित सॅनिटायझर उत्पादन सुरू आहे.
एचआर विभागाच्या प्रशासन अधिकारी अंजनी सिंह यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने सॅनिटायझरचे उत्पादन कमी करण्यात आले होते. आता मागणी वाढल्याने उत्पादनातही वाढ केली आहे. एका आठवड्यात मागणीची पूर्तता केली जाईल.