शामली : अप्पर दोआब साखर कारखाना शामलीने गोहरनी गावातील प्रगतशील शेतकरी आशुतोष सिंह यांच्या शेतामध्ये वसंत ऋतुतील ऊस लावणीस सुरुवात केली. शामली कारखान्याचे युनिट हेड प्रदीप कुमार सालार यांनी शेतावर पोहोचून फित कापून याची सुरुवात केली. त्यांनी शेतकऱ्यांना को ०१५०२३ आणि को ०११८ प्रजातीच्या ऊस बियाण्याची लागवड करावी असे आवाहन केले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, को ०२३८ प्रजातीचा ऊस असेल तर त्यासाठी जैव किडनाशक ट्रायकोडर्मा वापरावा. तसेच थायोफिनेट मिथाईलद्वारे बीज प्रक्रिया करावी. साखर कारखान्याचे ऊस विकास विभाग प्रमुख सी. पी. मलिक यांनी सांगितले की, किड, रोगांचा फैलाव पाहता यावेळी ऊसाचे तोडणी करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी ऊस विभागाचे महाव्यवस्थापक के. पी. सिंह सरोहा, व्यवस्थापक प्रविण कुमार, परिक्षित कुमार, शेतकरी विनय सिंह, पंकज सिंह, राजबीर सिंह, प्रदीप सिंह, सुधीर सिंह, मनोज सिंह आदी यावेळी उपस्थित होते.