साखर कारखाने ऑक्टोबर महिन्यातच सुरू करा: भाकियूची मागणी

मेरठ : सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी भारतीय किसान युनियनच्या (तोमर) बैठकीत करण्यात आली. याशिवाय कारखान्यांकडून थकीत ऊस बिले लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत याबाबतही चर्चा करण्यात आली. संघटनेचे जिल्हा महामंत्री हाजी मौ. अब्बा यांच्या भायला रोडवरील निवासस्थानी ही बैठक झाली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रदेश महासचिव डॉ. पंजाब सिंह यांनी सरकारने ऊस दर प्रती क्विंटल ५०० रुपये जाहीर करावा, कारखाने ऑक्टोबर महिन्यातच सुरु करावेत अशी मागणी केली. गांगनौलीसह इतर साखर कारखान्यांकडे गेल्यावर्षीचे थकीत असलेले ऊस बिल नव्या हंगामापू्र्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जावे, याबाबत चर्चा करण्यात आली. जे कारखाने कार्यक्षेत्रातील उसाचे पूर्ण ऊसाचे गाळप करू शकत नाहीत, अशा ठिकाणी इतर कारखान्यांना ऊस खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. युवा प्रदेशाध्यक्ष रईस मलिक, सुशील कुमार, अशोक त्यागी, फरमान अली आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here