मुंबई : अनेकांचे स्वप्न असते स्वत:चे घर असावे. मात्र, काही वेळा पैसे भरुनही बिल्डर वेळेवर रुमची (फ्लॅट) चावी देत नाही. किंवा प्रकल्प अर्धवट राहतो अथवा पूर्ण केला जात नाही. त्यामुळे घरासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा घर घेणाऱ्यावर पडतो. घर मिळत नाही. मात्र, बँकेचे कर्ज घेतल्याने व्याज आणि हप्ता याच्यात घर घेणारा पिसलाच जातो. त्यामुळे घर घेण्यासाठी कर्ज नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ येते. आता तुम्ही जर घर घेत असाल आणि तुम्हाला होम लोन (गृहकर्ज) घ्यायचे असेल तर बिनधास्त घ्या. कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकेने एक चांगली बातमी दिली आहे.
स्टेट बँकेने रेसिडेन्शिअल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी (आरबीबीजी) ही नवी कर्जयोजना सुरू केली आहे. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी या योजनेची घोषणा केली. सुरुवातीला सात शहरांत ही योजना लागू केली जाणार असून त्या अंतर्गत अडीच कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.
कुमार म्हणाले की, या कर्जयोजनेनुसार एखाद्या गृहप्रकल्पास ताबा प्रमाणपत्र (ओसी) मिळेपर्यंत आम्ही त्या कर्जाची हमी घेणार आहोत. या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आमच्याकडून ५० ते ४०० कोटी रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. तसेच, गृह कर्जदारांनाही कर्जाची हमी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.