समस्तीपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरू झालेल्या समाधान यात्रेवर टीकास्त्र सोडताना लोक जनशक्ती पार्टीचे (लोजपा) रामविलास गटाचे राष्ट्रीय महासचिव शाहनवाज कैफी यांनी यास नवीन वर्षाची पिकनिक सुरू झाल्याचे म्हटले आहे. जर राज्य सरकारने समस्तीपूर साखर कारखाना पुन्हा सुरू केला असता, तर त्यांना अशा कोणत्याही यात्रेचा आधार घ्यावा लागला नसता, अशी टीका त्यांनी केली.
कैफी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नितीश कुमार हे आपल्या गेल्या १७ वर्षांच्या सत्ताकाळात लोकांच्या समस्यांची सोडवणूक करू शकले नाहीत, आणि आता ते समाधान यात्रा सुरू करीत आहेत. ही यात्रा म्हणजे पिकनिकपेक्षा जास्त काहीच नाही. ते म्हणाले की, जर नितीश कुमार यांनी समस्तीपूर साखर कारखाना, दरभंगा येथील अशोक पेपर मील आदींच्या अडचणी सोडवल्या असत्या तर त्यांना समाधान यात्रेची गरज पडली नसती.