पुणे : दौंड शुगरतर्फे साखर कारखान्यातर्फे साखर कारखान्यातील सुरक्षेचे महत्व वाढविण्यासाठी एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र व सेफ्टी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ‘साखर उद्योगातील अपघात शक्यता व उपाय योजना’ हा चर्चासत्राचा प्रमुख विषय आहे. तरी राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या सेफ्टी ऑफिसर व सुरक्षा अधिकारी यांनी चर्चासत्रास उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन जगदीश ल. कदम यांनी केले आहे.
कदम म्हणाले कि, कारखान्यातील सेफ्टी ऑफिसर किंवा सुरक्षा अधिकारी यांना प्रवेश खुला राहील. तसेच प्रशिक्षण व चर्चासत्रात पूर्णवेळ सहभाग घेणा-या सेफ्टी ऑफिसर व सुरक्षा अधिकारी यांना प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र वितरित केले जाईल. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (पुणे विभाग) चे सह संचालक अखिल घोगरे, उप संचालक अंकुश खराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम दौंड शुगर कारखाना साईट, आलेगाव, ता. दौंड जि. पुणे येथे बुधवारी, २४ जुलै रोजी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत असणार आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.