पंजाबमध्ये पुन्हा थकीत ऊस बिलांचा मुद्दा तापला

चंडीगड : पंजाब सरकारने सहकारी साखर कारखाने आणि खासगी साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ८०० कोटी रुपये देण्याबाबत आदेश जारी करण्याची गरज आहे, असे पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी सांगितले. बाजवा यांनी दावा केली की, मी पंजाबच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ८०० कोटी रुपये जारी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र, आजपर्यंत मला कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

बाजवा म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारीपासून पैसे मिळालेले नाहीत. शेतकरी संघटनांनी २७ मार्च रोजी थकबाकी मिळण्याबाबत ब्यास येथे रेल्वे रोको आंदोलन केले होते. त्यानंतर पठाणकोट-जालंधर राज्यमार्गावर या विरोधात आंदोलनही केले. मात्र आजअखेर राज्य सरकारच्यावतीने कोणतीही प्रक्रिया आलेली नाही.
ते म्हणाले, पंजाबमध्ये पिकांच्या वैविध्यीकरणाची मागणी करण्यात आली आहे. या मुद्यावर सरकारची निष्क्रियता आहे.

त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. सरकारने या मुद्याची गरज लक्षात घ्यावी. पैसे देण्याबाबत सरकारने सहकारी तसेच खासगी कारखान्यांना तातडीने पैसे देण्याबाबत निर्देश जारी करण्याची गरज आहे. आमच्या शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट हा सरकारसमोरील प्राथमिक मुद्दा असला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here