थकीत ऊस बिलांबाबत भारतीय किसान संघाचे निवेदन

बुलंदशहर : साखर कारखान्यांकडे असलेली शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तातडीने देण्याची मागणी करत भारतीय किसान संघाने जिल्ह्यात समिती स्थापन करून कारखान्याच्या प्रशासकांना निवेदन सादर केले. वेव्ह साखर कारखान्यात जिल्हाध्यक्ष महेश चंद्र लोधी, जिल्हामंत्री पुष्पेंद्र त्यागी, जिल्हा कोषाध्यक्ष विजय गुप्ता, जिल्हा महिला प्रमुख विनती चौधरी, जिल्हा ऊस प्रमुख जगपाल सिंह, राजकुमार प्रधान आदींनी निवेदन दिले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अगौता साखर कारखान्यात भारतीय किसान संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष किशन कुमार तेवतिया, गौरी शंकर बाबू, बंटी आदींनी प्रशासनाला निवेदन दिले. तर साबितगढ कारखान्यात जिल्हा युवा प्रमुख सौरव शर्मा, योगेश राघव, गरिमा सिंह, विकास पंडित, मनोज धर्मेंद्र, मोहित आदींनी निवेदन सादर केले. जहांगिराबाद साखर कारखान्यात जिल्हा सहमंत्री दिलावर सिंह, ओमवीर सिंह, राकेश त्यागी, देवेंद्र सिंह, मोनू व राजीव यांनी प्रशासनाला निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष महेश चंद्र लोधी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वेळच्या वेळी ऊस बिले देणे ही कारखान्याची जबाबदारी आहे. दरम्याान, किसान संघाने जिल्हाधिकाऱ्यांनाही या विषयी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here