शामली : जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदार ऊस बिले देण्याचे आश्वासन देवूनही कार्यवाही करत नसल्याचा आरोप रालोदच्या नेत्यांनी केला. याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रालोदच्या नेत्यांनी उप जिल्हाधिकारी विशू राजा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थकीत ऊस बिलांप्रश्नी धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत ऊस बिले दिली जातील असे आश्वासन दिले. मात्र, ३० सप्टेंबरची मुदत संपूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बिले द्यावीत अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अॅड. राजकुमार वर्मा उपस्थित होते.