राज्यांनी वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा करावा : केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह

नवी दिल्ली : येथे झालेल्या उर्जा परिषदेत केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी एप्रिल 2024 ते जून 2024 या कालावधीत वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांना पुरेसा कोळशाचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला. या काळात विजेची मागणी 250 GW पर्यंत वाढू शकते म्हणून, राज्यांनी पुरेसा कोळसा असल्याची खात्री करावी, असे आवाहनही करण्यात आले. केंद्र सरकार राष्ट्रीय ग्रीड मजबूत करत आहे. राज्यांना राज्य ग्रीड मजबूत करण्याचा सल्ला देण्यात आला. सर्व राज्यांद्वारे पारंपारिक आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याच्या सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या.

6 आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी भारत मंडपम (नवी दिल्ली) येथे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जा आणि नवीकरणीय विषयावर ऊर्जा मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. या परिषदेत सचिव (ऊर्जा), सचिव (नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय), राज्यांचे उपमुख्यमंत्री/ऊर्जा/नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव सहभागी झाले होते.

या बैठकीत राज्यांना पॉवर प्लांटची देखभाल / दुरुस्ती फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण करावी, जेणेकरून मार्च ते जून दरम्यान सर्व प्लांट उपलब्ध होऊ शकतील. सर्व राज्यांना मार्च 2024 पूर्वी किमान 85 टक्के PLF लक्ष्यासाठी जनरेशन युनिट्सचे पुनरुज्जीवन करावे लागेल. चालू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यात यावी आणि पर्यावरण आणि इतर मंजुरीसाठी नियोजन आणि पुढील पिढीच्या सर्व प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, याबाबत सूचना करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here