या यादीमध्ये भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांना मानणाऱ्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे समजते.सहकारी कारखान्यांना एनसीडीसीमार्फत थकहमी कर्ज देण्यात येणार आहे. मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांच्या चेअरमनसोबत बेठक पार पडली. कारखानदारांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे -पाटील, अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
कोणत्या कारखान्यांना मिळणार कर्ज…
– सुंदरराव सोकूखे सहकारी साखर कारखाना बीड
– संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा
– वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी, अहमदनगर
– लोकनेते मारुतीराव घुले सहकारी साखर कारखाना, नेवासा
– किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई
– क्रांतिवीर नागनाथ अण्णा सहकारी साखर कारखाना वाळवा, सांगली
– किसन वीर सहकारी साखर उद्योग खंडाळा, सातारा
– अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती नगर, अकोले
– कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
– स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट
– मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, नेवासा
– शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
– शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव
– तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
– रावसाहेब पवार घोडगांगा सहकारी साखर कारखाना, शिरूर
– राजगड सहकारी साखर कारखाना, भोर
– विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, मुरुम भाजपा बसवराज पाटील