मुंबई : भारताचे बेंचमार्क इक्विटी निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी वधारले.सेन्सेक्स ३१७.९३ अंकांनी वधारून ७७,६०६.४३ वर बंद झाला, तर निफ्टी १०५.१० अंकांनी वधारून २३,५९१.९५ वर बंद झाला. हिरो मोटोकॉर्प, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एचडीएफसी लाईफ, एनटीपीसी या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली तर टाटा मोटर्स, सन फार्मा, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले.
बुधवारी सेन्सेक्स ७२८.६९ अंकांनी घसरून ७७,२८८.५० वर तर निफ्टी १८१.८० अंकांनी घसरून २३,४८६.८५ वर बंद झाला होता. भारतीय रुपया गुरुवारी बुधवारच्या ८५.७१ च्या बंदच्या तुलनेत किरकोळ घसरून ८५.७८ वर बंद झाला.