मुंबई : सोमवारी दुपारच्या सत्रात शेअर बाजार दिवसाच्या उच्चांकावरून झपाट्याने घसरला. बीएसई सेन्सेक्स सुमारे 850 अंकांनी तर एनएसई निफ्टी 23,650 अंकांच्या खाली घसरला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) विक्रीचा सपाटा, जागतिक कमजोर संकेत आणि रुपयाचे सतत होत असलेले अवमूल्यन याचा एकत्रित परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला.
NSE मधील बहुतांश निर्देशांक लाल रंगात बंद झाले तथापि, फक्त निफ्टी फार्मा निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढून बंद झाला. कंझ्युमर ड्युरेबल, एफएमसीजी आणि आयटी निर्देशांक काहीसे सकारात्मक बंद झाले. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस 7.5 टक्क्यांनी वाढून 2,592 रुपये वर गेला. इतर लाभधारकांमध्ये एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा या आयटी कंपन्या अनुक्रमे 2 टक्के आणि 1.7 टक्क्यांनी वाढल्या. नुकसान झालेल्यांमध्ये हिंदाल्को 2.6 टक्क्यांनी घसरले, त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट आणि टाटा मोटर्सचे शेअर्स प्रत्येकी 2.5 टक्क्यांनी घसरले.