शेअर मार्केट अपडेट : बाजार वधारला, मात्र साखर कंपन्यांचे शेअर घसरले

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सकाळी १०.३९ वाजता शुगर सेक्टरमधील शेअर्स खालावून ट्रेड करीत होत. एनएसईवर राजश्री शुगर्स अँड केमिकल्स (+३.०० टक्के) आणि साक्ती शुगर्स (+०.३१ टक्के अप) हे टॉप गेनर होते.
दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रिज (-२.९५ टक्के), ईडी पेरी (-२.८२ टक्के), मगधशुगर (-१.९९ टक्के), त्रिवेणी इंजिनीअरिंग (-०.६७ टक्के) आणि अवधशुगर (-१.७२ टक्के), द्वारिकेश शुगर इंडस्ट्रिज (-१.२२ टक्के), उत्तम शुगर मिल्स (-१.१८ टक्के), मवाना शुगर्स (-०.९७ टक्के), धराणी शुगर्स (-०.९१ टक्के), उगार शुगर वर्क्स (-०.९१ टक्के) हे टॉप लुजर होते.

इकॉनॉमित टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनएसई निफ्टी ५० इंडेक्स १३.८ अंकांनी वधारून १५८१२.९ वर ट्रेड करीत होता. तर बीएसई सेन्सेक्स ८४.३४ अंकांनी वधारून ५३१११.३१ वर सकाळी १०.३९ वाजता ट्रेड करीत होता. अॅक्सीस बँक (+१.६४ टक्के), पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन (+१.५६ टक्के), एचडीएफसी लाइफ (+१.३९ टक्के), कोटक महिंद्रा (+१.३७ टक्के, एसबीआय (+१.२५ टक्के), मारुती सुझुकी (+१.०१ टक्के), एसबीआय लाइफ (+०.९५ टक्के), एनटीपीसी (+०.६३ टक्के), ब्रिटानिया इंडस्ट्रिज (+०.६१ टक्के) आणि रिलायन्स इंडस्ट्रिज (+०.५५ टक्के) असे वधारून ट्रेड करीत होते.

दुसरीकडे बजाज ऑटो (-३.५६ टक्के), सिप्ला (२.२२ टक्के), ओएनजीसी (-१.७५ टक्के), टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट (-१.१७ टक्के), टेक महिंद्रा (-१.१ टक्के), बजाज फायनान्स (-१.०८ टक्के), यूपीएल (-१.० टक्के), इंडसइंड बँक (-०.९२ टक्के), बजाज फिनसर्व (-०.९२ टक्के), कोल इंडिया (-०.९ टक्के) अशी स्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here