शेअर बाजार: बँकनिफ्टी ने 53,180.75 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला

मुंबई: 27 जून रोजी सलग तिसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली.माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने निफ्टी निर्देशांकाने 24,000 ची पातळी ओलांडली. दिवसभराच्या सत्रात सुमारे 1128 शेअर्स वाढले, तर 2240 शेअर्सच्या किमतीत घट झाली.

बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकांनी अनुक्रमे 79,396.03 आणि 24,087.45 या नवीन विक्रमी उच्चांक गाठले.अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, LTIMindtree, विप्रो आणि NTPC हे निफ्टीमध्ये आघाडीवर होते. तर श्रीराम फायनान्स, एल अँड टी, आयशर मोटर्स, बजाज ऑटो आणि डिव्हिस लॅब मध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली. IT आणि पॉवर निर्देशांक 1.7 टक्क्यांनी वाढले. पीएसयू बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला, तर बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट राहिला तर स्मॉल कॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here