ऊसतोडणी टोळ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा : भारतीय किसान संघ

कोल्हापूर : ऊस तोडणी टोळ्यांनी खुशालीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट चालवली आहे. टनामागे ३०० रुपये खुशालीचा दर आहे. ट्रॉलीमागे ४ हजार ५०० रुपये तसेच एंट्रीचा भार वेगळाच आहे. गडहिंग्लज उपविभागात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप शिल्लक आहे. याचा गैरफायदा घेतला जात आहे. याबाबत भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने चंदगडच्या अथर्व – दौलत, ओलम या कारखाना प्रशासनांनी लक्ष घालून ऊस तोडणीच्या गाळपाचे नियोजन करावे, अशी मागणी केली.

भारतीय किसान संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात लाखो टन उसाची उचल व्हायची आहे. उसाची वेळेत उचल होत नसल्याने उसाला तुरे येऊ लागले आहेत. टोळ्यांनी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन टनामागे भरमसाठ खुशाली आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कारखान्यांनी जबाबदारी घेऊन ऊस उचलप्रश्नी लक्ष देऊन शेतकऱ्यांची लूट थांबवावी. याबाबत अथर्व कारखान्याचे सचिव मराठे, ओलमचे प्रमुख भरत कुंडल यांना निवेदन देण्यात आल. अथर्वचे शेती अधिकारी युवराज पाटील यांनी खुशालीसाठी अधिक पैसे न आकारण्याबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे, अनिकेत मांद्रेकर, गुरुदत्त फडणीस, ईराप्पा कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here