हरदोई: टोळ दलाने शेतकर्यांची झोप उडवली आहे. खास करुन जिल्ह्यातील ऊस शेतकरी अडचणीत आहेत. कारण या दिवसात ऊसाचे पीक तयार होत आहे. अशामध्ये पाने निर्मिती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. गेल्या रात्री सदई बेहटा जवळ आलेल्या टोळ दलाला ऊस विभागाने केमकिल फवारणी करुन मारण्याचा दावा केला आहे.
जिल्हा ऊस अधिकारी सना आफरीन यांनी सोंगितले की, जवळपास दोन एकर क्षेत्रफळामध्ये आलेल्या छोट्या टोंळ दलाला केमिकल फवारणी करुन संपवण्यात आले. शेतकर्यांच्या माध्यमातून वेळेवर सूचना मिळाल्यानंतर तात्काळ पथक तिथे पोचल्यामुळे टोळ दलाकडून पीकाचे फार नुकसान झाले नाही. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात कुठेही कोणतेही टोळ दल आढळले नाही. तरीही पूर्ण सतर्कता ठेवली जात आहे.
जिल्हा ऊस अधिकार्यांनी सांगितले की, टोळ दलाच्या हल्ल्याने शेतकर्यांचे आव्हान वाढवले आहे. टोळ दलाचे आगमन तसेच हल्ला याबाबत साखर कारखाना आणि ऊस विभागाने संयुक्तपणे रेड अॅलर्ट दिला आहे. शेतकर्यांना एसएमएस च्या माध्यमातून सातात्याने सूचना दिल्या जात आहेत. एक प्रभावी पाम्फलेट तयार करुन आतापर्यंत 54 हजार शेतकर्यांना त्याचे वितरण करण्यात आले आहे. साखर कारखाना आणि समिती स्तरावरुन 4,033 लीटर क्लोरोपाईरीफोस उपलब्ध करुन दिले आहे. शेतकर्यांना टोळ दल दिसल्यावर थाळी, ड्रम आदी वाजवून ध्वनि निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे. साखर कारखाना स्तरावरुन 102 ट्रॅक्टर चलित फवारणी टँकर ही तैनात केले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.