नवी दिल्ली: देशामध्ये कोरोना च्या संक्रमणाची गती कमी झालेली नाही. गेल्या 24 तासात 78 हजार 357 लोक संक्रमित आढळले आहेत. दरम्यान 1,045 लोकांचा मृत्यु झाला आहे. देशामध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या वाढून 37 लाख 69 हजार 524 झाली आहे, तर आतापर्यंत 66,333 लोकांनी आपला जिव गमावला आहे.
देशामध्ये अॅक्टिव्ह केसची संख्या वाढून 8 लाखावर गेली आहे.आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार देशामध्ये आता अॅक्टिव्ह केसची एकूण संख्या 8,01,282 आहे. आतापर्यंत एकूण 29 लाख 19 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
आईसीएमआर यांनी सांगितले की, 1 सप्टेंबरला एकूण 10 लाख 12 हजार 367 नमुन्यांची तपासणी केली गेली आहे आणि आतापर्यंत एकूण 4 करोड 43 लाख 37 हजार 201 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
अॅक्टिव्ह केस आणि रिकवर झालेल्या लोकांमध्ये अंतर वाढून 21 लाख पेक्षा अधिक झाले आहे. देशामध्ये कोरोना रिकवरी रेट 77 टक्क्याजवळ गेली आहे, तर मृत्युदर कमी होवून 1.77 टक्क्यावर आला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक केस येत आहेत. तर रिकवरी मध्ये 60 टक्के भागीदारीही या पाच राज्यातील आहे.