हरदोई : प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सहकारी ऊस समिती तसेच साखर कारखाना समितींच्या निवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. आता तिसर्यांदा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे समित्यांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. विविध राजकीय दलांचे लोकही या समित्यांमध्ये आपापले लोक कसे आणता येतील यासाठी कंबर कसून तयार आहेत.
मतदात्यांची यादी तयार करण्याचा कार्यक्रम 4 ऑगस्ट ला होईल. मतदाता यादीवर हरकत घेण्याची वेळ 5 ऑगस्टपर्यंत आहे, तर हरकत निवारण 6 ऑगस्ट ला जाहीर केले जाईल. यानंतर उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 7 ऑगस्टला होईल. 11 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. निवडणूक चिन्हांचे वाटप 11 ऑगस्ट , मतदान आणि मतमोजणी 13 ऑगस्ट ला निर्धारित करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये हरदोई ग्रोवर्स सहकारी ऊस विकास समितीमध्ये 50,870 शेतकरी सदस्य आहेत. तर मल्लावां सहकारी ऊस विकास समितीमध्ये 4,610, रुपापूर सहकारी समितीमध्ये 59,928, बघौली मध्ये 16,794 आणि हरदोई गेट सहकारी ऊस विकास समितीमध्ये 62,564 शेतकरी सदस्य आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी सना आफरीन यांनी सांगितले की, शासनाचे निर्देश मिळाले आहेत. नियमानुसार निवडणूका होतील. पूर्ण पारदर्शकता राहील. सुरक्षीततेसाठी पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेतले जाईल. मतदानापासून मतमोजणी निष्पक्षपणे केली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.