मेरठ : टोळां पासून शेतकऱ्यांचे पीक वाचवण्यासाठी ऊस विभाग आणि मवाना साखर कारखान्याने संगणमत केले आहे. दोघांनीही टोळांशी लढण्यासाठी युध्द पातळीवर तयारी केली आहे. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत 54 हजार शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
आसपासच्या प्रदेशातून आता टोळ दलाने उत्तर प्रदेशाकडे धाव घेतली आहे. टोळ दल शेतकऱ्याचा जुना शत्रू आहे. केवळ 15 ते 20 मिनीटात पीक, फळे, भाजी, फांद्या, ऊस, आंब्याला संपवण्याची क्षमता टोळ दलांमध्ये आहे. हे दल एका दिवसात १०० ते १५० कि मी दूर जाऊ शकतात. वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक शौबीर सिंह यांनी सांगितले की, टोळ दोन आठवड्यात प्रजनन करतात. प्रजननाच्या 24 तासानंतर मादा टोळ ओल्या जमिनीत १० ते १५ सेंटीमीटर खोल 200-250 अंडी घालतात. शेतकऱ्यांनी हा प्रयत्न करावा की, टोळांनी अंडी घालण्यापूवीच त्यांना मारावे. त्यांनी सांगितले की, यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री ज्या शेतात ते मुक्कामाला असतील, त्याची सूचना तात्काळ ऊस विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना द्यावी.
ऊस विभागाने एक हजार लीटर रोफायरीफॉस व एक हजार लीटर फिफरोनिल गोदामामध्ये उपलब्ध केले आहे , जे चार हजार हेक्टर फवारणीसाठी योग्य आहे. परिसरात वाटप करण्यासाठी दोन हजार पॅम्प्लेट छापले आहेत.
मवाना कारखान्याचे अप्पर महाव्यवस्थापक अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, टोळ दल दिल्लीत आले आहे. यांची झुंड कधी कुठे आणि कशी पोचेल हे सांगणे कठीण आहे. त्यांनी माहिती दिली की, 25 टँकरची व्यवस्था केली आहे आणि औषध देखील उपलब्ध आहेत. कारखाना कर्मचाऱ्यांकडून परिसरात पॅम्प्लेट वाटले जात आहेत. त्यांनी सुचवले की, टोळ दलापासून केवळ फवारणी करुनच बचाव होऊ शकतो.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.