सहारनपूर : ऊस विभाग आता शेतकर्यांना भाड्याने कृषी यंत्र देणार आहे. समित्यांकडे यंत्र आलेले आहेत जे तासांच्या हिशेबाप्रमाणे किरकोळ भाड्यावर शेतकर्यांना दिले जातील. यामुळे छोट्या शेतकर्यांना मोठा लाभ होईल. छोटे शेतकरी समिती कडून महाग कृषी यंत्र भाड्याने घेवून शेती करु शकतील.
ऊस विभागानुसार, फार्म मशीनरी बैंक तसेच कस्टम हायरिंग सेंटर योजनेअंतर्गत कृषी यंत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रॅक्टर पासून चीजलर, मलचर, पावर स्प्रेयर यांच्याबरोबरच पीक अवशेष नष्ट करणे आणि ऊस शेतीसंदर्भातील अनेक यंत्रांचा समावेश आहे. प्रत्येक समितीकडे 3-3, 4-4 यंत्र आले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी केएम मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, बेहट, देवबंद, सहारनपूर व सरसावा च्या समितींकडे काही कृषी यंत्र आले आहेत, काही येणे बाकी आहेत. शेतकर्यांना विशेष करुन लहान शेतकर्यांना महाग कृषी यंत्र खरेदी करता येत नाहीत.त्यांना याचा फायदा होणार आहे.
जिल्हा ऊस अधिक़ार्यांनी सांगितले की, कृषी यंत्रांचे भाडे देखील खूपच कमी ठेवले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पावर स्प्रेयर चे भाडे 5.84 रुपये प्रति तास असेल, तर चीजलर अडीच रुपये प्रति तासाप्रमाणे शेतकर्यांना भाडयाने दिले जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.