लखनऊ: प्रदेशातील ऊस शेतकर्यांना नवी शेती यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.ऊस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी सांगितले की, मुख्यतः ऊस शेतकर्यांजवळ परंपरागत कलट्ीवेटर यंत्र उपलब्ध आहेत, त्याऐवजी शेतकर्यांना रैटून मॅनेजमेंट डिवाईस (आर.एम.डी.) तथा मोल्ड बोल्ड प्लाउ ऐवजी स्थानावर डिस्क प्लाउ उपलब्ध केले जाणार आहेत.
नवी शेती साधने उदा. ऊस कटर प्लांटर, पावर लिटर/वीडर, मल्चर, शुकरगेन ट्रैश कटर आदींचा समावेश या योजनेमध्ये केला जाणार आहे, ज्यामुळे प्रदेशातील ऊस शेतकर्यांना चांगले उत्पादन मिळेल तसेच अधिक आर्थिक लाभही मिळू शकेल.
ऊस उत्पादकता वृद्धी कार्यक्रमांतर्गत 6 प्रकारच्या तांत्रिक प्रदर्शन स्थापना करण्यासाठी सांगण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या स्थापनेसाठी राष्ट्रीय खाद्यसुरक्षा मिशन अंतर्गत प्रदर्शनासाठी देय अनुदानाच्या समानतेने 9000 रुपये प्रति हेक्टर शेतकर्यांना अनुदानाचे वितरण देखील करण्यात यावे असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
प्रदेशामध्ये ऊस बि कार्यक्रमांतर्गत उन्नतीशील बि उत्पादन कार्यक्रमांत सर्व ऊस फार्म हाउस ना सिंगल बड चिप नर्सरी चे आदेश देण्यात आले आहेत. भूसरेड्डी म्हणाले, प्रदेशामध्ये गव्हाच्या पिकाच्या कापणीनंतर ऊसाची लागवड मे मध्ये सुरु राहते. यावेळी उच्च तापमानामुळे अंकुरणा मध्ये बाधा निर्माण झाल्याने ऊसाचे उत्पादन अधिक कमी होते. यावेळी चांगले उत्पादन मिळण्यासाठी सिंगल बड चिप नर्सरी चे आदेश देण्यात करण्यात आले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.