बरेली : केसर साखर कारखाना बंद झाल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने लॉक डाउन मुळे अडकलेल्या कारखान्यात काम करणाऱ्या 130 मजूरांना त्यांच्या घरी स्वखर्चावर पाठवले. रस्त्यात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना जेवणाची पाकीट आणि पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.
गेल्या आठवड्यात केसर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला होता. लॉक डाऊन मुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केसर कारखाना व्यवस्थापनाने 150 कत्राटी कामगारांना पदरचे पैसे खर्च करुन पाच बसमधून गोरखपुर, देवरिया, कुशीनगर, गोपालगंज, छपरा आणि सिवान येथे पाठवले. कारखान्याचे अध्यक्ष शरत मिश्रा यांनी सांगितले की, मजूरांना जेवणाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.