ऊसाची थकीत पैसे व्याजासहीत द्यावी

भारतीय किसान संघ मेरठ प्रांत कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा झाली. लवकरात लवकर ऊसाचे पैसे देण्याबाबत चर्चा झाली. प्रांतीय अध्यक्ष ठाकुर हरवीर सिंह यांनी सांगितले की, मेरठ प्रांतातील ऊस विभागाच्या तीनही मंडळांच्या 55 साखर कारखान्यांवर 26 मे पर्यंत शेतकऱ्यांचे 8373.9 करोड़ रुपए इतकी थकबाकी देय आहे.

ऊस खरेदी अधिनियमा अंतर्गत ऊसाच्या खरेदीच्या 14 दिवसाच्या आत ऊसाचे पैसे भागवणे असा नियम आहे. या नियमाचे पालन जर झाले नाही तर ऊस मूल्य व्याजासहित देण्याचाही नियम आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही निश्चित वेळेत पैसे भागवण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या अधिकच वाढत आहेत. ऊस थकबाकीचे पैसे व्याजासहित तात्काळ भागवावेत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. प्रांत महामंत्री राज सिंह चौहान यांनी गहू खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. बारदाण्याची कमी, पुरेसा साठा नसणे वगैरे सारख्या समस्यांना उचलून धरले आहे. आरोप करताना सांगितले की, काळा दाणा म्हणून सांगून गहू खरेदी करु नका असे सांगितले जात आहे. लागवडीवेळी झालेली अतिवृष्टी आणि यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नसल्याबाबत संताप व्यक्त केला. शेतकरी सन्मान निधी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना दिला जावा याबाबतही सांगितले. सरकारी ट्युबवेल आणि कालव्यांप्रमाणे खाजगी ट्यूबवेल ही वीज बिलापासून मुक्त करण्याची मागणी केली. प्रदेश महामंत्री रामकुमार जुरैल, संगठन मंत्री शिवकांत दीक्षित, क्षेत्रीय संगठन मंत्री सोनपाल आणि प्रांतातील अमरोहा सह सर्व 14 जिल्हयातील मंत्री व अध्यक्षांनी ऑनलाइन बैठकीमध्ये सहभाग घेतला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here