बागपत : रंछाड गावात रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ऊस थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज आणि विज बील माफ करण्याच्या मागणीबाबत रणनिती तयार करण्यात आली.
लवकरच आपल्या मागण्यांबाबत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ सीएम ना भेटणार आहे. बैठकीत बोलताना रविन्द्र हट्टी म्हणाले, कोरोनामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना डीजेलही महागात मिळत आहे. खासगी साखर कारखान्यांकडून देय देण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी आपले क्रेडिट कार्ड ही जमा करू शकत नाहीत.

तसेच विज बिल जमा करण्यातही ते असमर्थ आहेत. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने सर्व प्रकारची शेती कर्जे आणि विज बिल माफ करावे. ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून वाचतील. डीजेल च्या वाढत्या किंमतींंमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास त्रास होत आहे .
लॉकडाउन मध्ये बाजार बंद राहिल्यामुळे वीजेचे बील ही सरकारने माफ करावे. त्यांनी सांगितले की, उच्च शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या एससी ,एसटी विद्यार्थ्यांच्या फीच्या पूर्ति साठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महक सिंह होते तर बैठकीचे संचालन रविन्द्र हट्टी यांनी केले. बैठकीवेळी गजे सिंह, ओमकार सिंह, कतार सिंह, शाम सिंह, मास्टर ओमबीर सिंह, मास्टर पूर्ण सिंह, परशराम, विकाश, ऋषि पाल, जगबीर सिंह आदि उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.