कोल्हापूर, (दि. 17) पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर विदर्भ मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता शांत बसायचे नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून सोयाबीन कापसाची नुकसान भरपाई घेवू त्यासाठी 20 ऑक्टोंबरच्या चक्काजाम आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरा असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ते संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जाहिर सभेत बोलत होते. यावेळी रविकांत तुपकरांनी जळगाव जामोद मतदार संघातील 12 गावांचा दौरा केला.
या दौऱ्यादरम्यान रविकांत तुपकर यांचे हस्ते खळद व पांचाळा या गावात स्वाभिमानीच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. तर बावणबिर, खांडवी, रुधाणा आणि वडगाववाण येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, जळगाव जा. तालुका अध्यक्ष नितीन पाचपोर, योगेश मुरूख,रोषण देशमुख,सागर खानझोडे, रामेश्वर घाटे, गणेश वहितकर, गजानन आमझरे, विलास तराळे, राजू उमाळे, भगवान तायडे यांचेसह शेतकरी मोठया संख्येनी उ