शाहजहापूर: बजाज ग्रुपच्या मकसुदापूर साखर कारखाना आणि सहकारी क्षेत्रातील पुवाया साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिले न मिळआल्याबद्दल उप जिल्हाधिकारी रामसेवक द्विवेदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी सभागृहात शुक्रवारी ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांसोबत द्विवेदी यांनी बैठक घेतली. कारखानानिहाय किती पैसे थकीत आहेत, याचा आढावा त्यांनी घेतला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीत काही कारखान्यांनी पैसे दिल्याचे दिसले. दालमिया ग्रुपच्या निगोही साखर कारखान्याकडील एकूण ३२६३२.१७ लाख रुपयांपैकी २४ फेब्रुवारीअखेर २८५२१.८५ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. बिर्ला ग्रुपच्या रोजा साखर कारखान्याने आतापर्यंत १८८३९.९२ लाख रुपयाच्या ऊसाची खरेदी केली आहे. आणि २८ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी १२४९९.११ लाख रुपयांची बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. सहकारी क्षेत्रातील तिलहर कारखाना प्रशासनाने एकूण ७९६३.३८ लाख रुपयांपैकी २७ डिसेंबरपर्यंतच्या ऊस खरेदीवरील २५५८.२७ लाख रुपयांची बिले दिली आहेत. तर पुवाया साखर कारखान्याने ६६६५.०१ लाख रुपयांपैकी १७९२.८९ लाख रुपयांचे, वीस डिसेंबरपर्यंतचे पैसे दिले आहेत. मकसुदापूर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत ५१०.७० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.
उप जिल्हाधिकाऱ्यांनी मकसुदापूर कारखान्याच्या संथगतीने पैसे देण्याच्या कार्यवाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या निकषानुसार गतीने पैसे द्यावेत असे सांगितले. कारखान्यात उत्पादीत झालेली साखर बँकांकडून तसेच विक्री झालेल्या साखरेपैकी ८५ टक्के रक्कमेतून शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्यास सांगितले.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव, मकसुदापूर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. सी. त्यागी, रोजा कारखान्याचे अध्यक्ष मुनेश पाल, पुवाया कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर. के. श्रीवास्तव, निगोही कारखान्याचे महाप्रबंधक आशिष त्रिपाठी, पुवाया ऊस समितीचे सचिव विनोद कुमार आदी उपस्थित होते.