नोएडा : देशातील सर्वात मोठी एकीकृत साखर उत्पादक कंपनीपैकी एक, इंजिनीअर टू ऑर्डर हाय स्पीड गिअर आणि गिअरबॉक्स उत्पादनातील प्रमुख, पाणी आणि इतर जल व्यवस्थापन व्यवसायातील अग्रणी कंपनी, त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिज लिमिटेडने काल चौथ्या तिमाही आणि ३१ मार्च २०२३ (Q४/FY २३) रोजी समाप्त झालेल्या पूर्ण वर्षासाठी आपल्या शानदार आर्थिक निकालाची घोषणा केली आहे. कंपनीचा चौथ्या तिमाहीतील शुद्ध नफा ७४ टक्क्यांनी वाढून १९० कोटी रुपये झाला आहे.
कामगिरीचे अवलोकन : Q4/FY 23 (एकत्रित परिणाम)…
सर्व सेगमेंटमध्ये उच्च विक्रीमुळे वाढीत योगदान
कंपनीने सर्व सेगमेंटमध्ये उच्च विक्रीपासून वाढीत योगदान दिले आहे. नवी आसवनी क्षमता, मिलक नारायणपूरमध्ये एक मोठी मल्टी फीड डिस्टिलरी आणि मुझफ्फरनगरमध्ये एक धान्यावर आधारित डिस्टिलरीसह सध्याच्या डिस्टिलरी क्षमतेमध्ये वाढीमुळे कंपनीच्या मध्य व्यवसायात उच्च विक्री नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये प्रॉफिट बिफोर टॅक्स (PBT) किरकोळ रुपात घटून ५६२.४ कोटी रुपये झाला आहे. कारण गेल्या आर्थिक वर्षात, २०२२ मध्ये ₹ ५७ कोटींचे निर्यात अनुदान मिळाले होते. Q४ FY २३ मध्ये PBT ६६.९% वाढून ₹ २५०.६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिर वर्ष २३ आणि आर्थिक वर्ष २३च्या चौथ्या तिमाहीदरम्यान साखर निर्यात, उच्च विक्रीचे प्रमाण आणि आसवनी उत्पादनंसाठी वाढलेल्या किमती, उच्च टर्नओव्हरमुळे चांगली कामगिरी झाली आहे.
३१ मार्च, २०२३ रोजी स्टँडअलोन आधारावर एकूण कर्ज ८२४.९६ कोटी रुपये
३१ मार्च, २०२३ रोजी स्टँडअलोन आधारावर एकूण कर्ज ३१ मार्च २०२२ च्या ₹१५०३.७४ कोटी रुपयांच्या तुलनेत ₹८२४.९६ कोटी आहे. आढाव्याच्या तिमाही कालावधीच्या अखेरीस स्टँडअलोन कर्जात ₹३०१.०८ कोटींच्या मुदत कर्जाचा समावेश आहे. अशी जवळजवळ सर्व कर्जे व्याज सवलत किंवा सवलतीच्या व्याजदरावर आहेत. एकत्रित आधारावर, ३१ मार्च २०२२ रोजी ₹ १५६७.९६ कोटींच्या तुलनेत एकूण कर्ज ₹ ९१३.८३ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २३ यादरम्यान एकूण निधीची गरज गेल्या वर्षीच्या ५ टक्क्यांच्या तुलनेत ५.१ % आहे.
कंपनीच्या कामगिरीमुळे आनंद : अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ध्रुव एम. साहनी
कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर टिप्पणी करताना त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ध्रुव एम. साहनी म्हणाले की, आम्ही ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेल्या वर्षातदरम्यान कंपनीच्या कामगिरीने आनंदी झालो आहोत. कंपनीने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. खास करून हंगाम २०२२-२३ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ऊस गाळप करून वार्षिक आधारावर ११ टक्के वाढ मिळवली आहे. मजबुत कामगिरीसह अनुक्रमे ₹ ६,३१०.१ आणि ₹५,६१६.८ कोटी रुपयांची समग्र एकूण आणि निव्वळ व्यावसायिक उच्चांक प्रस्थापित करण्यात आला आहे. यासोबतच ६६० किलो लिटर प्रती दिन (केएलपीडी) पर्यंत क्षमता विस्तारानंतर उच्चांकी अल्कोहोल उत्पादन आणि विक्री झाली आहे. ५०० कोटी रुपयांहून अधिक एकूण इंजिनअरिंग व्यवसाय झाला आहे. मद्य आणि इंजिनीअरिंग व्यवसायाने एकूण सेगमेंट परिणामात ५० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान दिले आहे.
सरकारकडून साखरेच्या किमात विक्री दरात वाढीची अपेक्षा
साखर व्यवसायात, आम्ही शेतकऱ्यांशी जोडले जाण्यासह डिजिटल माध्यमातून विविधता आणणए आणि पिक उत्पादनाच्या वाढीसाठी कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करीत आहोत. मूल्यवर्धन, गुणवत्ता सुधारणा आणि प्रीमियम उत्पादनांच्या सादरीकरणासह साखरेच्या किमतीत वाढ करणे यास आमचे प्राधान्य राहिल. आमच्या देवबंद युनिटमध्ये विनिर्माण प्रक्रिया बदलल्यानंतर रिफाईंड साखर आमच्या एकूण उत्पादनाचा ६० टक्के हिस्सा आहे. पुढील वर्षात आम्ही हा हिस्सा वाढून ७० टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. सरकारकडून साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढीची अपेक्षा करीत आहोत. कारण, देशांतर्गत साखरेच्या किमती स्थिर आहेत आणि हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस दरवाढीनंतर खर्च समायोजन करण्यासाठी ते पुरेसे नाही.
डिस्टिलरीचे निव्वळ व्यवसायात २१ % योगदान…
अल्कोहोलच्या व्यवसायात, डिस्टिलरी क्षमता वाढल्यानंतर वर्षभरात उत्पादन आणि विक्रीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. वाढलेल्या गाळपामुळे आमच्या डिस्टिलरीजसाठी अधिक बंदिस्त कच्चा माल प्रदान करत आहेत. चालू वर्षात, डिस्टिलरीपासून महसुलाने आमच्या निव्वळ व्यवसायात २१ टक्क्यांचे योगदान दिले आहे आणि ही डिस्टिलरी क्षमता सध्याच्या ६६० केएलपीडीपासून १११० केएलपीडीपर्यंत प्रस्तावित वाढीसाठी सज्ज आहे. आम्हाला असे वाटते की, २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) उद्दिष्ट पुर्तीसाठी सरकारला ऊसाचा रस आणि धान्यावर आधारित इथेनॉलच्या किमतींमध्ये सुधारणा करण्याची गरज भासू क्षकते. कारण, क्षमतेमध्ये आणखी वाढीसह योजनांच्या व्यवहार्यतेमध्ये सुधारणा होऊ शकेल.
इंजिनीअरिंग व्यवसायाची चांगली कामगिरी
आमचा इंजिनीअरिंग व्यवसाय चांगली कामगिरी करत आहेत आणि आमच्या दृष्टीने आम्ही दीर्घकालीन वाढीच्या मार्गावर आहेत. पॉवर ट्रान्समिशन व्यवसायाचे हे विक्रमी वर्ष होते, जेथे मजबूत उलाढाल आणि नफा मिळाला. याशिवाय, सर्व सेगमेंट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रगती करीत आहेत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेगमेंटमध्ये पॉवर ट्रान्समिशन आणि सुरक्षा व्यवसाय या दोन्हीमध्ये गुंतवणुकीसह खास करुन भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेद्वारे आम्ही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही संधी साधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जल व्यवसाय ही महापालिका आणि औद्योगिक दोन्ही क्षेत्रांसाठी टर्नकी एक्झिक्यूशन आणि पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रदाता आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. हा विभाग FY२३ मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च उलाढाल करण्यासाठी तयार आहे. हा विभाग नामांकित आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी बोली लावत आहे.
शेअरधारकांसाठी एक दीर्घकालिक मूल्य निर्मिती
त्रिवेणी इंजिनीअरिंगचा विकासासाठी गुंतवणूक करून आणि शेअरहोल्डरचा परतावा सुधारण्याच्या उद्दिष्टाने बाजारातील स्थिती सुधारताना व्यवसायाकडे विवेकपूर्ण दृष्टिकोन ठेवण्याचा दीर्घ इतिहास आहे. गेल्या काही वर्षात कंपनीने सुविधांचे आधुनिकीकरण, अनेक फिडस्टॉकचा वापर करुन अतिरिक्त डिस्टिलेशन क्षमता स्थापित करणे, पॉवर ट्रान्समिशन आणि सुरक्षेसाठी नव्या सुविधांमध्ये गुंतवणूक, उच्च गुणवत्तेच्या भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित करून वैविध्य वाढवले आहे. आम्हाला विश्वास आहे की या गुंतवणूकीमुळे भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मिती होईल.