संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांसाठी लढा उभारू : ख्रिस्तोफर फोन्सेका

पणजी : संजीवनी साखर कारखान्यातील कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्यापेक्षा त्यांना अन्यत्र सामावून घ्यावे. स्वेच्छा निवृत्तीपेक्षा कामगारांची नोकरी कशी कायम राहील, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली. फोन्सेका यांनी सोमवारी (१० जुलै) कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांची भेट घेऊन चर्चा केली. ते म्हणाले कारखाना प्रशासक कामत यांना तीन निवेदने देण्यात आली आहेत. पहिल्या निवेदनात कामगारांची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कारखाना बंद असला तरी कारखान्याचा पेट्रोल पंप, शेती आणि अन्य आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु आहेत. ज्याठिकाणी ७० ते ८० कामगार काम करतात. त्याचबरोबर कारखान्याच्या सुरक्षेसाठी २० सुरक्षारक्षक आहेत. यामध्ये कामगारांना सामावून घेणे शक्य आहे का ? याबाबत विचार विनिमय करण्यासाठी दुसरे निवेदन देण्यात आले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या वेज बोर्डनुसार कामगारांना अजून पैसे मिळाले नाहीत. ही थकबाकी कामगारांना देण्यात यावी, अशी मागणी तिसऱ्या निवेदनातून करण्यात आलाचे फोन्सेका यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here