तरनतारन साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी

अमृतसर : गेल्या १६ वर्षांपासून बंद असलेल्या शेरॉन (तरनतारन) मध्ये १०३ एकरात पसरलेला साखर कारखाना पुन्हा चर्चेत आला आहे. ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार तरनतारनचे आमदार डॉ. कश्मीर सिंह सोहल यांनी राज्य सरकारकडून हा कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की अलिकडेच त्यांनी सहकार मंत्री हरपाल सिंह चीमा यांच्याशी चर्चा केली आहे. आणि सहकार मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, कारखाना लवकरात लवकर सुरू केला जाईल.

तरनतारन साखर कारखान्यात १९८६-८७ मध्ये गळीत हंगाम सुरू करण्यात आला होता. मात्र, गेल्या १६ वर्षांपासून कारखाना बंद आहे. राज्य सरकारने कारखाना बंद झाल्यानंतर जवळपास १२०० कर्मचाऱ्यांना थकबाकी देऊन प्रक्रिया पूर्ण केली होती. तेव्हा हा कारखाना शेतकऱ्यांची जीवनवाहिनी होती. शेतकऱ्यांना २६ एकरातील बिज उत्पादन फार्ममधून चांगले बियाणे देण्यात आले. कारखाना बंद झाल्यानंतर हे फार्मही रिकामे पडले आहे. कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री खराब झाली आहे. काही शेतकरी संघटनांच्याकडून कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here